Special Report | बरदाश्त, बरबाद आणि ‘साडे तीन’ नेत्यांचं सस्पेन्स!
कीकडे किरीट सोमय्या ठाकरेंच्या डझनभर मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा दावा करतायत. त्यावर आता संजय राऊतांनी भाजपच्या ''साडे तीन'' नेत्यांना जेलमध्ये दाडण्याचा इशारा दिलाय. उद्या दुपारी 4 वाजता राऊत नेमकं काय समोर आणणार? याची उत्सुकता ताणली गेलीय. कारण गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत वारंवार 15 फेब्रुवारी या तारखेची भाजपला आठवण करुन देत आहेत.
एकीकडे किरीट सोमय्या ठाकरेंच्या डझनभर मंत्र्यांना तुरुंगात टाकण्याचा दावा करतायत. त्यावर आता संजय राऊतांनी भाजपच्या ”साडे तीन” नेत्यांना जेलमध्ये दाडण्याचा इशारा दिलाय. उद्या दुपारी 4 वाजता राऊत नेमकं काय समोर आणणार? याची उत्सुकता ताणली गेलीय. कारण गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत वारंवार 15 फेब्रुवारी या तारखेची भाजपला आठवण करुन देत आहेत. राऊत नेमकं कुणाबाबत बोलतायत याचा सस्पेन्स आहे. दोन दिवसांपासून संजय राऊत ईडी, भाजप नेते आणि खासकरुन किरीट सोमय्यांवर निशाणा साधत आहेत.
राऊत ईडीविरोधात काही समोर आणणार, भाजप नेत्यांविरोधात काही पुरावे देणार, की मग किरीट सोमय्यांवर निशाणा साधणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.वर्षभरापासून भाजपच्या सोमय्यांनी ठाकरे सरकारमागे आरोपांची मालिकाच लावलीय. शिवसेनेच्या अनिल परबांच्या कथित रिसॉर्टपासून ते कोव्हिड सेंटरच्या कथित घोटाळ्यापर्यंतच्या आरोपांचा त्यात समावेश आहे.