सोमय्यांना स्वप्नात देखील बंगलेच दिसतात – राऊत

| Updated on: Feb 18, 2022 | 6:24 PM

किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी  सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे कुंटुबीयांच्या नावावर अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या या आरोपाला संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सोमय्या यांना स्वप्नात देखील बंगले दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी  सुरूच असल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे कुंटुबीयांच्या नावावर अनधिकृत बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांच्या आरोपांचे खंडन केले होते. सोमय्या यांनी बंगले दाखवावेत मी राजकारण सोडून देईल आणि जर बंगले नसतील तर सोमय्यांना जोड्याने मारा असा इशाराच थेट राऊत यांनी दिला होता. दरम्यान आता पुन्हा एकदा राऊत यांनी सोमय्यांवर निशाणा साधला आहे. सोमय्या पागल झाले आहेत. त्यांना स्वप्नात देखील बंगले दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मोदींना मराठी कळतं म्हणताच मोदी हसले!
खरं कोण उद्धव ठाकरे की रश्मी ठाकरे?, किरीट सोमय्यांचा सवाल