Sanjay Raut | चुकीला माफी नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लक्षात ठेवेल, राऊतांचा प्रसाद लाड यांचा इशारा
चुकीला माफी नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लक्षात ठेवेल, असा इशाराच राऊतांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.
शिवसेना भवन फोडण्याचं विधान भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या अंगलट आलंय. माझ्या विधानाचं माध्यमांनी विपर्यास केला, असं म्हणत त्यांनी सारवासारव केली. मात्र गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. चुकीला माफी नाही, महाराष्ट्र आणि शिवसेना लक्षात ठेवेल, असा इशाराच राऊतांनी प्रसाद लाड यांना दिला आहे.