Sanjay Raut : दिल्लीत आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत, सर्वपक्षीय खासदारांना चहापानाचं आमंत्रण, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती
दिल्लीत आम्ही सर्व खासदार एकत्र आहोत. सर्वपक्षीय खासदारांना चहापानसाठी आमंत्रण दिलंय, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. राज्यातील सर्व पक्षीय खासदार दिल्लीत आले आहेत, असं शिवसेना नेते संजय राऊत म्हणालेत
नवी दिल्ली : दिल्लीत (Delhi) आम्ही सर्व खासदार (MP) एकत्र आहोत. सर्वपक्षीय खासदारांना चहापानसाठी आमंत्रण दिलंय, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिली आहे. राज्यातील सर्व पक्षीय खासदार दिल्लीत आले आहेत. त्यांच्यासाठी संध्याकाळी माझ्याकडे चहापान आहे. नंतर शरद पवार यांच्याकडे जेवण आहे. आम्ही यजमान आहोत. राजकीय वातावरण खेळीमेळीत राहावं. विचारांच आदानप्रदान व्हावं, मी सगळ्या आमदारांना बोलावलं आहे. आमच्याकडे फाळणी होत नाही, जातीय धार्मिक फळणी विरोधात आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Published on: Apr 05, 2022 12:36 PM