रामलल्लावर देखील भाजपनं टॅक्स लावला? संजय राऊत नेमंक काय म्हणाले?

| Updated on: Nov 14, 2023 | 10:58 AM

मध्य प्रदेशातील जनतेने भाजपला मतदान केले किंवा मध्यप्रदेशात भाजपचे सरकार जनतेने निवडून दिले तर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचे मोफत दर्शन दिले जाईल, असे अमित शाह यांनी म्हटल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. राम हा पूर्ण देशाचा आहे. निवडणुकींच्या प्रचारात रामाचा वापर केला जातोय, असेही त्यांनी म्हटले

Follow us on

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२३ | राम हा पूर्ण देशाचा आणि जगाचा आहे. पण राजकीय निवडणुकींच्या प्रचारात रामाचा वापर केला जातोय, अशी सडकून टीका ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशातील निवडणुकांवर देखील भाष्य केले आहे. मध्यप्रदेशात सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये भाजपचा दारूण पराभव होताना दिसतोय. या निवडणुकांकरता सगळे भाजपचे मोठे नेते उतरले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यप्रदेशातील जनेतला असे सांगितले की, जर मध्यप्रदेशातील जनतेने भाजपला मतदान केले, मध्यप्रदेशात भाजपचं सरकार आणलं तर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाचं मोफत दर्शन दिलं जाईल, असे अमित शाह म्हणाले. अमित शाह यांनी असं विधान करणं हे अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.