शिवसैनिक फटे लेकिन हटे नही, Sanjay Raut यांचा Rahul Gandhi यांना सल्ला
संजय राऊत आज शिरुरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो.
संजय राऊत आज शिरुरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.