शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडतायत संजय राऊतांची घोषणा

| Updated on: Jan 24, 2022 | 12:50 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भविष्यातील शिवसेनेची दिशा स्पष्ट केली आहे. दिल्लीच्या दिशेने आमची पावलं पडत आहेत. आता या पुढे आम्ही प्रत्येक राज्यात निवडणुका लढू, अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भविष्यातील शिवसेनेची दिशा स्पष्ट केली आहे. दिल्लीच्या दिशेने आमची पावलं पडत आहेत. आता या पुढे आम्ही प्रत्येक राज्यात निवडणुका लढू, अशी घोषणाच संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आज संजय राऊत यांनी शिवसेनेचा भविष्यातील प्लानच जाहीर केला. शिवसेनेची पावलं दिल्लीच्या दिशेने पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल हा स्पष्ट संदेश दिला आहे. आम्हाला देशभर विस्तार करायचा आहे, त्यासाठी संघर्ष करण्याची अडचणीचा सामना करण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक राज्यात आम्ही निवडणुका लढवू. आज यश येणार नाही. उद्या यश येईल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यात आहे.

 

नागपुरात ST कर्मचारी संपावर तरी, आगाराचं उत्पन्न लाखोंवर!
पुण्यामध्ये आजपासून जलतरण तलाव, मैदानं खुली