VIDEO : Sanjay Raut | कोरोना नियमांचं पालन करुन दसरा मेळावा होणार – संजय राऊत

| Updated on: Oct 06, 2021 | 12:34 PM

कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

कोरोनाचं संकट जरासं ओसरु लागल्याने यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार नाही. तो नियम आणि संकेत पाळून कशा पद्धतीने साजरा करता येईल, याचं नियोजन सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही तशी इच्छा आहे, असं सांगत शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार असल्याचे संकेतच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षीचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. अगदी मोजके महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला. परंतु आता कोरोनाचं संकट ओसरु लागलं आहे.

VIDEO : Ambarnath | अंबरनाथ शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य, भाजप घालणार पालिकेचं श्राद्ध
VIDEO : ZP Election Results | धुळ्यात भाजपने झेडपी राखली, नंदुरबारमध्ये पंचायत समितीत सीमा मराठे विजयी