VIDEO : Sanjay Raut | गोव्यात प्रस्थापितांच्या विरोधात सामान्यांना उभं करु – संजय राऊत
येत्या 18 किंवा 19 तारखेला मी गोव्यात जाणार आहे. त्यावेळी आम्ही गोव्यातील आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. काँग्रेस सोबत जागा वाटप नीट होऊ शकलं नाही.
येत्या 18 किंवा 19 तारखेला मी गोव्यात जाणार आहे. त्यावेळी आम्ही गोव्यातील आमच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहोत, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. काँग्रेस सोबत जागा वाटप नीट होऊ शकलं नाही. त्यांची काही मजबुरी असेल, आमची काही मजबुरी आहे. एनसीपीची काही मजबुरी आहे. आमची चांगली चर्चा झाली होती. पण पुढे गेली नाही. राजकारणात असं होत असतं निवडणुकीच्या काळात. याचा अर्थ कुणी निवडणुका लढवू नयेत असं नाही. आम्ही निवडणुका लढू. उमेदवारांची यादी तयार होतेय. 18 आणि 19 तारखेला आमची यादी जाहीर करू, असं राऊत म्हणाले.