VIDEO : Sanjay Raut | केजरीवाल यांच्या ‘त्या’ एका कामामुळे सोनू सूद भाजपचा दुश्मन झाला : संजय राऊत
आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले की, केजरीवाल यांच्या 'त्या' एका कामामुळे सोनू सूद भाजपचा दुश्मन झाला आहे.
आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदशी (Sonu Sood) संबंधित त्याच्या सहा ठिकाणांवर एक सर्वेक्षण केले. वास्तविक, या सर्वेक्षणाद्वारे, आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. हा छापा नाही, किंवा आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता यासंदर्भात संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले की, केजरीवाल यांच्या ‘त्या’ एका कामामुळे सोनू सूद भाजपचा दुश्मन झाला आहे.