Sanjay Raut | दिल्लीत सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवरील निवासस्थानी पार पडेलल्या या बैठकीला स्वत: सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी, शिवसेना खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या मुंबई दौऱ्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएच्या अस्तित्वावरुन जोरदार चर्चा झडायला सुरुवात झाली होती. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी यांचा काँग्रेस विरोध शिवसेनेला मान्य नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत अजून एक मोठी बैठक पार पडली.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथवरील निवासस्थानी पार पडेलल्या या बैठकीला स्वत: सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला, कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचूरी, शिवसेना खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात शरद पवार यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बॅनर्जी यांनी पवारांसमोरच राहुल गांधी यांच्याव जोरदार टीका केली होती. तसंच यूपीए कुठे आहे? असा सवालही केला होता. बॅनर्जींच्या या बैठकीनंतर यूपीएबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर आज झालेल्या बैठकीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.