VIDEO : Sanjay Raut | मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित, घडलेली घटना दुर्दैवी : संजय राऊत

| Updated on: Sep 11, 2021 | 2:29 PM

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला आरसा दाखवला आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे.

VIDEO : Mumbai Rape Case | बलात्कार पीडितेचा मृत्यू; श्वेता महाले, नसिम खान, भाई जगताप यांच्या प्रतिक्रिया
Uddhav Thackeray | मुंबई बलात्कार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅकवर चालवा, उद्धव ठाकरेंनी दिले आदेश