“काल अर्जुन खोतकर यांनी माध्यमांसमोर प्रामाणिकपणे मान्य केलं…”, संजय राऊत यांचं वक्तव्य

| Updated on: Jul 28, 2022 | 10:56 AM

काल अर्जुन खोतकर यांचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर तणाव आहे. संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधतो. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं नाराज असल्यानं सेना सोडली नाही. त्यांची मालमत्ता जप्त केली गेली.

मुंबई: अर्जुन खोतकरांनी (Arjun Khotkar) काल प्रामाणिकपणे मान्य केलंय की तणाव असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला, अडचणीच्या काळात माणूस सुटकेचा मार्ग शोधणारच त्यानुसार त्यांनीही शोधला आणि हे त्यांनी माध्यमांसमोर (Media) स्पष्टही केलं असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की, या देशावर कुणी राज्य करावं हे जनता ठरवेल. पण राज्यकर्त्यांनी देशावर राज्य करु नये. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या (ED) कारवाया होत आहेत. कुणी धुतल्या तांदळासारखा आहे? काल अर्जुन खोतकर यांचं निवेदन ऐकलं असेल तर त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर तणाव आहे. संकटाच्या काळात सुटकेचा मार्ग शोधतो. शिवसेनेच्या कार्यपद्धतीनं नाराज असल्यानं सेना सोडली नाही. त्यांची मालमत्ता जप्त केली गेली.

 

 

Published on: Jul 28, 2022 10:56 AM
Sushma Andhare : सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करणार, शिवसेनेला मिळणार आंबेडकरी चळवळीचा चेहरा
“संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील म्हणून…”- संजय राऊत