शिंदे गट आता फक्त 2-4 महिन्यांपुरताच, ठाकरे गटाच्या नेत्याची भविष्यवाणी

| Updated on: Apr 04, 2024 | 5:41 PM

तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली. तर रामटेक आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली. अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय

एकनाथ शिंदे यांचा पक्ष फक्त दोन चार महिन्यांचाच आहे, असे म्हणत ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर विधानसभेपर्यंत हा पक्ष राहील असं वाटत नाही, असे म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटासंदर्भात भविष्यवाणीच केली. तर रामटेक आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचा पत्ता कट झाल्याचे म्हणत टीकाही केली. ठाकरे गटाते नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. ‘2 ते 4 महिन्यानंतर ठाकरे गटाला उमेदवार काय कार्यकर्ता देखील मिळणार नाही. लाखोंच्या होणाऱ्या सभा आता हजारोंवर आल्यात अशी सध्याची परिस्थिती आहे’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले तर काही दिवसांनी ठाकरे गटाचे नेते गल्लीत फिरताना दिसतील, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

Published on: Apr 04, 2024 05:41 PM
काळजी घ्या… राज्यात एप्रिल, मे महिन्यात कसं असणार तापमान? हवामान विभागाचं आवाहन काय?
भाजप आमदाराच्या पत्नीनं हाती बांधलं ‘घड्याळ’, पक्षप्रवेश करताच मिळाली लोकसभेची उमेदवारी