‘संजय राऊत शेण खाणारा पोपट; आम्ही पेरू-मिरची खाणारे पोपट पाहिले पण…’, शिवसेना नेत्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Aug 13, 2024 | 2:55 PM

Sanjay Shirsat on Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि महायुतीचे नेते यांच्यात नेहमीच शाब्दिक युद्ध रंगताना दिसते. अशातच शिंदे गटाच्या शिवसेनेतील एका नेत्यानं संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. बघा नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

लवकर निवडणुका होणार असून यामध्ये लोकांचं खरं रूप दिसेल, या निवडणुकीच्या माध्यमातून जनता ठरवेल कुणाला या महाराष्ट्रात ठेवायचं आणि कुणाला हद्दपार करायचं, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यावर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला सवाल केला असता त्यांनी संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. संजय राऊत शेण खाणारा पोपट आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत यांच्या वक्तव्याला काय किंमत देतात.संजय राऊत जनतेची दिशाभूल करत आहे संजय राऊत हा शेण खाणारा पोपट आहे. त्या अविर्भावात संजय राऊत वक्तव्य करत असतात. त्यांच्याकडून चांगल्या वक्तव्याची अपेक्षा काय करायची’, असे संजय शिरसाट म्हणाले तर यापूर्वी आम्ही पेरू खाणारे, मिरची खाणारे पोपट पाहिले पण असा शेण खाणारा पोपट कधी पाहिला नाही… असंही संजय शिरसाट यांनी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published on: Aug 13, 2024 02:55 PM
हिरव्या सापाची जीभ वळवळतेय, मुनव्वर फारूकीला नितेश राणे दाखवणार मालवणी हिसका, म्हणाले…
‘राऊत अन् वडेट्टीवार एकदम बेशरम निर्लज्ज, त्यांनी लोकांच्या…’, विरोधकांच्या टीकेवरून राणांचा पलटवार