‘अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, आमच्याकडेही बघा’, संजय शिरसाट यांची नाराजी
आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पुन्हा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, थोडं आमच्याकडेही बघा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली.
आमदार संजय शिरसाट यांच्याकडून पुन्हा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी पुन्हा बोलून दाखवली. अतुल सावे मागून आले आणि मंत्री झाले, थोडं आमच्याकडेही बघा, अशा शब्दांत त्यांनी नाराजी बोलून दाखवली. अतुल सावेंच्या वडिलांसोबत शिरसाट यांनी काम केलं. “मला कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. त्याबाबतची अपेक्षा मी बोलून दाखवली आहे”, असं शिरसाट यांनी याआधी म्हटलं होतं. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादचे संदिपान भूमरे, संजय शिरसाट, अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिंदे सरकारकडील मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तारांचा समावेश झाला आणि संजय शिरसाट यांचं नाव माघारी घेण्यात आलं.
Published on: Aug 21, 2022 02:58 PM