Sanjay Shirsat on Sanjay Raut : मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर देताना संजय शिरसाटांनी काढली राऊतांची औकात
शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन काल उबाठा गटाकडून साजरा केला. उबाठाच्या नेत्यांना सांगायचं काय. पुन्हा तेच तेच...बाप चोरला.. अशी टिका करून बाळासाहेब ठाकरेंना का लहान करताय तुम्ही? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ते नेते संजय शिरसाट यांनी उबाठा नेत्यांवर हल्लाबोल केला.
शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन काल उबाठा गटाकडून साजरा केला. ज्या शिवसैनिकांनी संघटना उभी केली, त्यांचा उल्लेख काल करणं अपेक्षित होतं. काल ज्यांनी भाषणं केली त्यांचं भवितव्य कुठं होतं? हा संशोधनाचा विषय आहे. उबाठाच्या नेत्यांना सांगायचं काय. पुन्हा तेच तेच…बाप चोरला.. अशी टिका करून बाळासाहेब ठाकरेंना का लहान करताय तुम्ही? असा सवाल करत शिवसेना प्रवक्ते नेते संजय शिरसाट यांनी उबाठा नेत्यांवर हल्लाबोल केला. तर मोदी ब्रँड होता आता ते ब्रँडी झालेत अशी टीका संजय राऊतांनी केली. यावर बोलताना संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊत यांनी सकाळी येऊन रोज भाकीतं केली एकतरी खरं ठरलं का? मोदींवर टीका करतात… या बेवड्यांकडून अपेक्षा काय करायची? बेवडे असेच बोलणार? आपली लायकी काय? आपण कोणावर टीका करतोय? असे अनेक सवाल करत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर चांगलाच पलटवार केला.