VIDEO : Sanjay Shirsat यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळणार ?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच्या तब्बल 39 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतर पहिल्यांदा सुरत त्यानंतर आसाम आणि शेवटी गोवा येथे बंडखोर आमदार वास्तव्यास होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणामध्ये प्रचंड घडामोडी घडल्या. उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन करून चर्चेसाठी दारे खुली असल्याचे देखील सांगितले होते.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाच्या तब्बल 39 आमदारांना सोबत घेत बंडखोरी केली होती. त्यानंतर पहिल्यांदा सुरत त्यानंतर आसाम आणि शेवटी गोवा येथे बंडखोर आमदार वास्तव्यास होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणामध्ये प्रचंड घडामोडी घडल्या. उध्दव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्यासाठी भावनिक आवाहन करून चर्चेसाठी दारे खुली असल्याचे देखील सांगितले होते. मात्र, बंडखोर आमदारांनी ठाकरे यांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाने सत्तास्थापन देखील केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले असून आता मंत्रीमंडळ जाहिर होण्याच्या हालचालींना वेग आलायं. संजय सिरसाट यांना समाजकल्याण मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.