अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली कमाल ! बहुपयोगी पेरणी यंत्राची ‘वाह वाह’, तुम्ही पाहिलं का यंत्र?

| Updated on: Jun 12, 2023 | 7:10 AM

VIDEO | शेतकऱ्यांच्या वेळीची आणि पैशांची बचत करणारं आलं यंत्र, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी काय केली कमाल?

अहमदनगर :  शेतकऱ्यांना पेरणी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कोपरगाव मधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी पेरणी यंत्र बनवले असून या यंत्राला देशपातळीवर झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालाय…मजूरांची कमतरता , वेळेची बचत यासोबत शेतक-यांची खर्चाची देखील बचत होणार आहे. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेती पुरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठात घेण्यात आली..यात कोपरगाव मधील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शेतकरी कुटुंबातील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या स्वयंचलित बहुउपयोगी रोप पेरणी यंत्राने अव्वल स्थान पटकावून देश पातळीवर यश मिळवलय. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या 25 जणांच्या टीमने हा प्रकल्प पूर्ण केला असून एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडुन त्या सऱ्यांच्या मधील भरावावर रोपाची लागवड करता येणार आहे. याच बरोबर रोपा भोवती मल्चींग पेपर अंथरणे , रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरता येऊ शकते.
Published on: Jun 12, 2023 07:10 AM
भावी मुख्यमंत्रीच्या स्पर्धेत राज ठाकरे यांची एन्ट्री, वाढदिवसाच्यानिमित्त कुठं केली बॅनरबाजी?
Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या समुद्रात अधिक तीव्र; ‘या’ किनारपट्टी भागाला तडाखा