‘कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण…’, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचा जबाबात खळबळजनक खुलासा

‘कराडच्या सांगण्यावरून देशमुखांनी घुलेला मारहाण…’, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचा जबाबात खळबळजनक खुलासा

| Updated on: Mar 28, 2025 | 4:08 PM

'कराडनं सरपंचाला धडा शिकवायला सांगितल्यानेच अपहरण करून हत्या केली. देशमुखांच अपहरण करून आम्ही त्यांना दोन तास मारहाण केली.', आरोपींची कबुली

सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांनी घुलेला मारहाण केली, असं आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख करण्यात आला आहे. फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळेने सुग्रीव कराडचं नाव सांगितलं, असं देखील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार याने म्हटलंय. तर सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी चार महिन्यांनंतर आपला जबाब दिलाय. देशमुखांची क्रूर हत्या केल्याची आरोपी सुदर्शन घुलेची पोलिसांसमोर कबुली दिली. सुदर्शन घुलेच्या जबाबातील हत्येची दोन तासांची क्रूर कहाणी आणि त्याचा घटनाक्रम पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आला आहे. तर सरपंच संतोष देशमुखाला खाली उतरवून उघडं करून त्याला लाकडी काठी, पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी दोन तास जबर मारहाण करत होतो. जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे २ ते ३ वेळा बोलण झालं, असा धक्कादायक जबाब सुदर्शन घुलेने दिला.

Published on: Mar 28, 2025 04:08 PM
Sanjay Shirsat : ‘जमल्यास त्यांचंही दूध काढू’, पिसाळलेला कुत्रा उल्लेख करत शिरसाटांचा राऊतांच्या ‘त्या’ जहरी टीकेवर पटलवार
Rohini Khadse : ‘…त्यांना मन की बात सांगावी’, ‘सौगात ए मोदी’ कीटवरून राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं डिवचलं