वाल्मिक कराडवर मकोका लावण्यासाठी अल्टिमेटम, मस्साजोगमध्ये नेमकं काय-काय घडलं?
सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या भावानं पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन चार तास चाललं. वाल्मिक कराडवर मकोका न लावण्याने आणि तपासाची माहिती न दिली जात असल्याने धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले.
तपासाची कोणतीच माहिती दिली जात नाही, यासह वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या भावाने धनंजय देशमुख यांनी केली आहे. तर दुसरीकडे आज सकाळी १० वाजेपर्यंत मागण्या मान्य केल्या नाहीतर आत्मदहनाचा इशारा मस्साजोगच्या गावकऱ्यांनी दिलाय. सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांच्या भावानं पाण्याच्या टाकीवर चढून केलेलं आंदोलन चार तास चाललं. वाल्मिक कराडवर मकोका न लावण्याने आणि तपासाची माहिती न दिली जात असल्याने धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर चढले. आंदोलनाची माहिती मिळताच मनोज जरांगे मस्साजोगमध्ये आलेत. बीडचे एसपी नवनीत कॉवत हे देखील आंदोलनस्थळी हजर झालेत. या दोघांनीही फोनवरून धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. मात्र तपासाची कोणतीही माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी म्हटले. यासगळ्या प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील यांनी बीडचे एसपी नवनीत कॉवत यांच्याशी फोनवरून मध्यस्थी केली आणि तपास अधिकाऱ्यांशी बोलण्याचं ठरलं. त्यानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटताच अश्रू अनावर झालेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट