बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर…, कसा दिला पोलिसांना चकवा?

| Updated on: Jan 04, 2025 | 2:39 PM

सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जे तीन आरोपी फरार होते ते वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास होते. बीडमधील तिन्ही फरार आरोपी भिवंडीमध्ये दोन दिवस वास्तव्याला होते अशी माहिती मिळते. सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे दोन दिवस भिवंडीमध्ये होते. या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र अद्याप एक आरोपी फरार आहे. या आरोपींचा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा ठाव-ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सीआयडी, त्याचबरोबर एसआयडी आणि बीड पोलिसांची वेगवेगळी पथके करत होती. या तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे आरोपी फरार झाले होते. या फरार आरोपींपैकी सुदर्शन घुले हा टाकळीगावचा आरोपी आहे आणि तिथेच त्याचा एक लहानपणीचा मित्र भिवंडीमध्ये वास्तव्यास आहे, त्याच्याकडे ते काही दिवस गेलेले होते. दोन दिवस त्यांनी तिथे वास्तव्य केले होते, अशी माहिती आता समोर आलेली आहे. मात्र पोलिसांचं पथक ज्यावेळी भिवंडीमध्ये पोहोचलं त्यावेळेला त्याच्या काही तास आधीच हे तिन्ही आरोपी तिथून फरार झालेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी ठिकाण बदललं आणि काही दिवस लपले.

अखेर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना आता पुण्याच्या बालीवडीवरून अटक करण्यात आलेली आहे. मात्र आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे नावाचा अद्याप फरार आहे. तो एक दिवस आधीच तिथून पुण्यातील बालीवडीतून दुसरीकडे निघून गेले असल्याचं सुद्धा माहिती मिळत आहे.

Published on: Jan 04, 2025 02:39 PM
नारायण राणे यांची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून 4 जणांना अटक, प्रकरण नेमकं काय?
‘लई अवघड हाय गड्या…’, अमोल मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा