जगातील सर्वात खोल विहीर! पठ्ठ्यानं एक एकरात 60 फूट खोल, दोनशे फूट रुंद बांधली विहीर
VIDEO | हिंगोलीच्या पठ्ठ्यानं एक एकरात 60 फूट खोल, दोनशे फूट रुंद विहीर बांधली, पाहा कशी आहे ही भव्य विहीर?
हिंगोली, १० ऑगस्ट २०२३ | सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं पाण्यावर तोडगा काढला आहे. एक नवा प्रयोग करून पाण्याच्या प्रश्न कायमचा मिटावा यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगांव येथील शेतकरी संतोष शिंदे यांनी एक एकर जमिनीवर तब्बल 200 फूट लांबी रुंदी आणि 60 फूट खोल विहीर बांधली आहे. त्यांना यासाठी 05 लाख विट,1600 ब्रास रेती, साडे चार हजारांच्यावर सिमेंट बॅग, 450 क्विंटल गजाळी, तार, खिळे आणि मंजुरीसह इतर असा पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंगोलीतील शेतकरी पठ्ठ्यानं पाच कोटी खर्च करून स्व-खर्चातून 200 बाय 200 लांबी-रुंदीची, 60 फूट खोल विहीर बांधली आहे. हिंगोली या जिल्ह्यातील या विहिरीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
Published on: Aug 10, 2023 06:28 PM