Santosh Deshmukh Video : बापाच्या आठवणीने जीव व्याकूळ अन् मन अस्वस्थ.. वडिलांचा भास होताच वैभवीनं रेखाटलं संतोष देशमुखांचं चित्र
हुंदका दाटून येतो, डोळ्याच्या कडा पाणवतात अन् समोर वडिलांचा भास होताच काय करते? वैभवी देशमुखने जे सांगितलं त्याने तुमचेही डोळे पाणवतील
सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांचे चित्र काढले आहे. वडिलांची आठवण झाली की मी त्यांचे चित्र काढते, असं वैभवी देशमुख हिने म्हटलंय. वडिलांची आठवण आल्यानंतर मला अस्वस्थ वाटायला लागतं, वडिलांची आठवण आल्यानंतर मी चित्र काढते आणि माझा वेळ घालवते, असं वैभवी देशमुख हिने सांगितले. वैभवी देशमुख हिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली. बारावीनंतर वैभवी देशमुख पुढे काय करणार असा सवाल विचारला असता तिने सांगितेल, ‘वडिलांनी मला कधी कोणत्याही गोष्टीचा दबाव टाकला नाही. त्यांची इच्छा एकच होती की मी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवी. मला पहिल्यापासून चित्रकलेची आवड होती. मी नीटची तयारी करत होते त्यामुळे मला यामध्ये यश मिळावं ही वडिलांची इच्छा होती’, असं वैभवी देशमुख हिने म्हटलं. यासोबत वैभवी देशमुखने संतोष देशमुख प्रकरणातील पहिली सुनावणी १२ तारखेला पार पडली. यावर बोलताना ती म्हणाली, ‘ही सुनावणी होत असताना संतोष देशमुख यांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. तर या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा व्हावी.’, अशी अपेक्षाही वैभवी देशमुख हिने व्यक्त केली.