Karad Custody Video : वाल्मिक कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ
पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने मागितलेल्या खंडणीमध्ये अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांची हत्या झाली, असा दावा सीआयडीने केली. तर कराडला पोलीस कोठडी सुनावल्याने बीड कोर्टाबाहेर वकिलांमध्येच जुंपली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पवनचक्कीच्या अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने मागितलेल्या खंडणीमध्ये अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांची हत्या झाली, असा दावा सीआयडीने केली. तर कराडला पोलीस कोठडी सुनावल्याने बीड कोर्टाबाहेर वकिलांमध्येच जुंपल्याचे पाहायला मिळाले. यावेळी वाल्मिक कराडच्या समर्थनात आणि विरोधात घोषणाबाजी झाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे, असं म्हणत वकील हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी केली. यानंतर कराडच्या वकिलांनाही घोषणाबाजी करत प्रत्युत्तर दिलं. आक्रमक झालेल्या हेमा पिंपळे यांना महिला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर वाल्मिक कराडवरून वकील आमने-सामने आल्यानंतर कराडचे समर्थक आणि विरोधकही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. कोर्ट परिसरात एकच गदारोळ झाला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला आणि काहींना ताब्यातही घेतलं.. बघा कोर्ट परिसरात नेमकं काय-काय घडलं?