Satara Landslide | डोंगर-ओढ्यातून 8 KM पायी प्रवास, TV9ची टीम दुर्घटनाग्रस्त आंबेघरच्या Ground Zeroवर

| Updated on: Jul 24, 2021 | 8:54 PM

साताराच्या आंबेघ रमधील एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 8 किलोमीटरचा पायी प्रवास करुन टीव्ही 9 मराठीची टीम दुर्घटनास्थळावर पोहोचली. त्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.

सातारच्या पाटण तालुक्यातील आंबेघरमधील कोळेकर कुटुंबावर काळानं घाला घातला आणि अख्खं कुटुंब संपलं. दरड कोसळून आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक ढिगाऱ्याखाली दबले होते. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये कोळेकर कुटुंबातील 6 जणांचा समावेश होता. या एकाच कुटुंबातील 6 जणांवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तब्बल 8 किलोमीटरचा पायी प्रवास करुन टीव्ही 9 मराठीची टीम दुर्घटनास्थळावर पोहोचली. त्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं.

Video | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे
Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या चिपळूणमधील नुकसानीची करणार पाहणी