सातारा: शहीद जवान विपुल इंगवलेंना अखेरचा निरोप

| Updated on: Jun 06, 2022 | 1:20 PM

शहीद जवान विपुल इंगवलेंना त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील भोसे हे विपुल इंगवले यांचं गाव आहे.

शहीद जवान विपुल इंगवलेंना त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्या भागातील नागरिक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सातारा जिल्ह्यातील भोसे हे विपुल इंगवले यांचं गाव आहे. कोरेगाव तालुक्यातील भोसे गावचे विपुल दिलीप इंगवले यांना आले वीरमरण आहे. सियाचीन येथे -39° सेल्सिअसमध्ये ऑपरेशन मेघदुत बजावत असताना शहीद विपुल इंगवले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी केले होते रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये मागील एक वर्षापासून सुरू होते उपचार होते. उपचारादरम्यान कमांड हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावरती मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published on: Jun 06, 2022 01:20 PM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 06 June 2022
सलमान, सलीम खान यांना आलेलं धमकीचं पत्र TV9च्या हाती