प्रतापगड किल्ला तब्बल 365 मशालींच्या तेजोमय प्रकाशानं उजळला, बघा नेत्रदिपक नजारा

| Updated on: Oct 09, 2024 | 12:06 PM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा प्रतापगड किल्ला 365 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. या गडावरील भवानीमातेच्या मंदिराला 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवरात्रोत्सवात प्रतापगडावर मशाली पेटवल्या जाऊ लागल्या आणि गेली 15 वर्षे ही परंपरा अखंड सरू आहे .

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदी मध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवली आणि तिची स्थापना 1661 मध्ये प्रतापगडावर केली. या घटनेला 2010 मध्ये 350 वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर 350 मशाली पेटविण्यात आल्या. आता प्रत्येक वर्षी या मशाली मध्ये 1 मशालीची वाढ होते आहे. या वर्षी 365 मशालींनी हा प्रतापगड किल्ला तेजोमय झाला आहे. ढोल गजराच्या ताशात या गडाच्या पूर्ण तटाच्या बाजूला मशाली पेटवल्याचे पाहायला मिळाले. हा क्षण प्रत्येकाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. बघा याचाच नेत्रदिपक व्हिडीओ

Published on: Oct 09, 2024 12:06 PM