दिशा सालियन प्रकणात आदित्य ठाकरे फसणार? अ‍ॅड. निलेश ओझा यांनी थेट आरोपींची नावंच सांगितली, म्हणाले…

| Updated on: Mar 25, 2025 | 3:16 PM

मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरेंवर या तक्रारीत गंभीर आरोप करण्यात आले. या प्रकरणातील दुसरे दोषारोपपत्र का दाबण्यात आले. ते कुणाच्या विरोधात होते, असा सवाल वकील निलेश ओझा यांनी केला.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान यांनी अ‍ॅड. निलेश ओझा यांच्यासह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनी आज हायकोर्टाने सुधीर व्होरा प्रकरणात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिशा सालियान हिच्या संशयास्पद मृत्यूची तक्रार दिली. दरम्यान, यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिशा सालियनचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी थेट दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींची नावंच सांगितली. आदित्य ठाकरे, दिनो मोरया, सुरज पांचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंग, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती हे सर्व आरोपी असून या सर्वांवर कारवाई करा, असं अ‍ॅड. निलेश ओझा यांनी म्हणत ओझा यांच्या मते ही तक्रारच एफआयआर असल्याचे सांगितले आहे. धक्कादायक म्हणजे आदित्य ठाकरे हे ड्रग्स व्यवसायात सहभागी असल्याचा गंभीर आरोप अ‍ॅड. निलेश ओझा यांनी केला. दिशा सालियान यांच्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी जे काही गुन्हे केले, त्यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा पूर्ण गैरवापर केला असल्याचा गंभीर आरोपही ओझा यांनी केला.

Published on: Mar 25, 2025 03:04 PM
Cm Devendra Fadnavis : बलात्कारी, दंगेखोरांचा पुळका कशाला? ते स्वातंत्र्य सेनानी आहेत का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट सवाल
Daund Crime News : धक्कादायक! कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्लॅस्टिकच्या बरण्या; बरण्यांमध्ये अर्भकं, काय आहे प्रकार?