वेळ आल्यावर उत्तर देणार, निलंबित होताच सत्यजित तांबे यांचा सूचक इशारा
काँग्रेसने निलंबित केल्याच दुःख झालं असल्याची भावना व्यक्त करत सत्यजित तांबे म्हणाले...
काँग्रेसच्या युवा नेत्यांपैकी अग्रस्थानी असलेले सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली. सत्यजित तांबे यांनी विधानपरिषदेच्या नाशिक विभागातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत जोरदार प्रचार त्यांचा सुरू आहे. सध्या ते अहमदनगरच्या पारनेर दौऱ्यावर आहेत.
यादरम्यान, काँग्रेसने निलंबित केल्याच दुःख झालं असल्याची भावना सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे. तसेच आमच्या परिवाराला काँग्रेसमध्ये शंभर वर्षे पूर्ण होतील काँग्रेसने विचारपूस करायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तर आम्ही काम करताना कधी जातिवाद केला नाही आम्ही सर्वांना समान न्याय दिला असून या मतदारसंघात आमच्या परिवाराचं मोठं ऋणानुबंध असल्याचे तांबे यांनी म्हटलंय. २२ वर्ष काँग्रेसमध्ये काम केले असून काँग्रेससोडून कोणताही विचार कधी केला नाही. अनेक जण अनेक पक्षात आले गेले, मोठे झालेत मात्र तशी कोणतीही भावना न ठेवता एकनिष्ठतेने पक्षाकडे पाहिले.
नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या प्रचारादरम्यान मिळत असून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी या मतदारसंघात गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. हे काम करत असताना शिक्षण क्षेत्र, शिक्षक, पद्वीधर आणि बेरोजगारांचे प्रश्न त्यांनी सातत्याने विधानपरिषदेतील सभागृहात सादर करण्याच प्रयत्न केला आणि लोकांची मनं जिंकली. ही निवडणूक राजकारण म्हणून महत्त्वाची नसून या मतदारसंघाशी असलेला ऋणानुबंध पुढे घेऊन जाण्यासाठीचे काम मला करायचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.