सत्यजित तांबे यांनी घेतली विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ
सत्यजित तांबे यांच्या शपथ विधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची हजेरी
अहमदनगर : सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली आहे. सत्यजित तांबे यांच्या शपथ विधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लगावली होती. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून सत्यजित तांबे यांचा विजय झाला. सत्यजित तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पहिले दादा अजित दादा तर दुसरे दादा सत्यजित दादा…आणि एकच वादा सत्यजित दादा अशा घोषणाबाजींने शपथविधी सोहळ्याचे स्थळ दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Feb 08, 2023 02:46 PM