Save Aarey Protest: “सेव्ह आरे!” आरे जंगल वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचं आंदोलन

| Updated on: Jul 10, 2022 | 11:55 AM

राज्य सरकारच्या आरेतच कारशेड करण्याच्या निर्णयाविरोधात पुन्हा आरे बचावची हाक दिली आहे. यापुढे प्रत्येक रविवारी असे आंदोलन होणार असून या प्रत्येक आंदोलनात मुंबईकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन पर्यावरणप्रेमी करतायत.

मुंबई : पर्यावरण (Environment) प्रेमींकडून आरे बचाव आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) देखील सहभागी होणार आहेत. विरोध असतानाही राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आरे बचाव आंदोलन आणखी तीव्र करण्यात आले आहे. गेल्या रविवारी आरेत पिकनिक पॉइंट येथे दोन वर्षांच्या काळानंतर मोठे आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारच्या आरेतच कारशेड करण्याच्या निर्णयाविरोधात पुन्हा आरे बचावची हाक दिली आहे. यापुढे प्रत्येक रविवारी असे आंदोलन होणार असून या प्रत्येक आंदोलनात मुंबईकरांनी सहभागी व्हावे,असे आवाहन पर्यावरणप्रेमी करतायत. नवीन सरकारने मेट्रो कारशेडचा (Metro Mumbai) प्रकल्प आरे मध्येच होणार असल्याचं सांगितलं आणि पर्यावरणप्रेमींनी आंदोलन करायला सुरुवात केली.सरकारने लोकांचं म्हणणं ऐकावं अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी करतायत.

Parbhani Vishal Kadam| खासदार संजय जाधव यांची मुख्यमंत्र्यासोबत झालेली भेट ही निव्वळ योगायोग
Eknath Shinde: कार्यकर्त्याचं प्रेम बघा! डोक्यावर कोरली एकनाथ शिंदेंची प्रतिमा