पंतप्रधान आवास योजना : छत्रपती संभाजी नगरचे धागेदोरे पुणे आणि आकोल्यापर्यंत, ईडीची छापेमारी सुरू

| Updated on: Mar 17, 2023 | 3:54 PM

VIDEO | छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा आता पुणे आणि अकोल्यातही छापेमारी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ पुणे आणि नागपूर, आकोला येथे अंमलबाजावणी संचालनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरू आहे. ईडीकडून समर्थ कन्स्ट्रक्शनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या आधारे आता ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं पंतप्रधान आवास योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ईडीकडून शहरातील तीन ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी याप्रकरणी समर्थ कन्स्ट्रक्शन अँड जे.व्ही, इंडो लग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस आणि सहयोगी कंपन्यांविरोधात तक्रार दिली होती. या तिन्ही कंपन्यांनी एकाच संगणकावरून निवेदा भरल्याने महानगरपालिकेच्या निविदा संहितेतील अटी शर्तीचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

Published on: Mar 17, 2023 03:52 PM
गोपीनाथ मुंडे यांच्या सोळा फूट उंच पुतळ्याची ड्रोनच्या नजरेतून बघा पहिली झलक
आमच्याकडे प्लान तयार, नाना पटोले यांनी काय दिला सूचक इशारा