उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याची लंका कोणत्याही क्षणी जळू शकते- किरीट सोमय्या
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किरीट सोमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत. कशालाही सोमय्याची बेनामी संपत्ती म्हणत आहेत. त्यामुळे आता खऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
भाजपाची बुस्टर सभा चांगलीच गाजली. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारच्या घोटाळ्यांना आग लावण्याचं काम भाजप करणार आहे. भाजपाचे नेते आता अॅक्टिव्ह मोडवर असून कोणत्याही क्षणी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची लंका जळू शकते. याची भीतीही त्यांना वाटतेय, असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किरीट सोमय्याला घाबरून काहीही आरोप करत आहेत. कशालाही सोमय्याची बेनामी संपत्ती म्हणत आहेत. त्यामुळे आता खऱ्या घोटाळेबाजांवर कारवाई होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
Published on: May 02, 2022 03:45 PM