Kolhapur | कोल्हापुरातल्या राऊतवाडी धबधब्याची नयनरम्य दृश्यं, पर्यटकांना धबधब्यावर जाण्यास बंदी
एरवी पावसाळी पर्यटनासाठी इथं मोठी गर्दी असते मात्र यावेळी कोरोनामुळे यंदा बंदी असल्याने अगदी तुरळक पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळताहेत.
कोल्हापूर : कोल्हापुरातील मुसळधार पावसानंतर आता जिल्ह्यातील छोटे-मोठे धबधबे ओसंडून वाहायला लागलेत. त्यामुळे वर्षा पर्यटकांची पावलं आपसूकच तिकडे वाळताहेत. राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे. हा धबधबा आता पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहतोय. दीडशे फूट वरून पडणाऱ्या या धबधब्याजवळ निसर्गाचे एक मनोहरी रूप सध्या अनुभवायला मिळतंय. एरवी पावसाळी पर्यटनासाठी इथं मोठी गर्दी असते मात्र यावेळी कोरोनामुळे यंदा बंदी असल्याने अगदी तुरळक पर्यटक या ठिकाणी पाहायला मिळताहेत.