School सुरू करण्यााबत शालेय शिक्षण विभागाचा Uddhav Thackeray यांच्याकडे प्रस्ताव -tv9

| Updated on: Jan 19, 2022 | 7:22 PM

येत्या सोमवारपासून शाळा (School in Maharashtra) सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे.

मुंबई : येत्या सोमवारपासून शाळा (School in Maharashtra) सुरु केल्या जाण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना शिक्षणमंत्र्यांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षकांकडून शाळा सुरु करण्याची मागणी होतेय. ज्याठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल, त्याभागातील तिथले स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्या माध्यमातून शाळा सुरु ठेवण्याबाबतचा निर्णय घेतला जावा. तसे अधिकार दिले जावे, याबाबतचा प्रस्ताव मुख्ममंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणं, शिक्षकांच्या दोन्ही लसी पूर्ण करणं, या गोष्टीवरही भर देण्याचा प्रयत्न प्रस्तावातून देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर वर्ग बंद

कोरोनाच्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पुन्हा ऑनलाईन करण्यात आल्या होत्या. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करुन पुन्हा एकदा घरातून ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. सगळ्यात आधी मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर खबरदारी म्हणून अनेक पालिका क्षेत्रांनी आणि जिल्ह्यांमध्ये शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, आता कोरोना रुग्णवाढ पुन्हा कमी झाल्यामुळे तसंच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणालाही वेग आल्यानं शाळा पुन्हा सुरु केल्या जाव्यात अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र धोका अजूनही टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासकीय अधिकारी यांच्याकडे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार दिले जावेत, असा प्रस्ताव देण्यात आला आहेत. या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Swarnav Kidnap case Pimpri |अपहरण झालेल्या स्वर्णवचा 10 दिवसानंतर लागला शोध -tv9
Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला