राज्यातील ‘या’ शाळा वगळता सर्व शाळांना सुट्टी, शिक्षण मंत्र्यांनी काय दिली महत्त्वाची माहिती
VIDEO | राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी, शिक्षण मंत्र्यांची काय मोठा घोषणा
मुंबई : राज्यातील उन्हाचा कडाका वाढल्याने आजपासून राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील मोठी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, ज्या शाळांचा अभ्यासक्रम सुरू आहे, अशा शाळा वगळता राज्यातील बोर्डाच्या सर्व शाळांना आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यातील शाळा यंदा १५ जून रोजी सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने त्या ठिकाणी ३० जूनपासून शाळा होणार असलस्याचेही दीपक केसरकर यांनी दिली आहे. यावेळी दीपक केसरकर यांनी सांगितले की, राज्यातील शाळा १५ जून नंतर सुरू होणार असल्या तरी सुट्टीचे नियोजन विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना करता यावे यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही दीपक केसरकर यांनी दिली.