School Reopen | शाळा बंदच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांमध्ये नाराजी ?

School Reopen | शाळा बंदच्या निर्णयाबाबत तज्ज्ञांमध्ये नाराजी ?

| Updated on: Aug 13, 2021 | 8:37 AM

शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील  पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला गुरुवारी स्थगिती देण्यात आली होती.

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील  पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु  करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

Published on: Aug 13, 2021 08:37 AM
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 13 August 2021
Mumbai | कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरण बंद, प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहन