Pune | Schools Unlock | पुण्यात शाळा सुरू, शिवाजी मराठा हायस्कूलमधून लाईव्ह

| Updated on: Oct 04, 2021 | 8:08 AM

राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, अशा सूचनाही वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

पुण्यात शाळा सुरू, शिवाजी मराठा हायस्कूलमधून लाईव्ह.मुंबईबरोबरच राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.