पहिलं रॉकेट… धर्म… आणि इस्त्रोच्या उड्डाणाची कहाणी तुम्हाला माहितीये का?
VIDEO | विज्ञान आन् धर्म, इस्त्रोच्या उड्डाणाची कहाणी तुम्हाला माहितीये का? इस्त्रोची कहाणी एका चर्चमधून सुरू झाली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या ६० वर्षांपूर्वी केरळच्या एका लहानशा चर्चमधून इस्त्रोची सुरूवात झाली
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | इस्त्रोची कहाणी एका चर्चमधून सुरू झाली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण आजच्या ६० वर्षांपूर्वी केरळच्या एका लहानशा चर्चमधून इस्त्रोची सुरूवात झाली. केरळच्या समुद्र किनाऱ्याजवळ एक थुंबा नावाचं छोटं गाव. तेव्हा डॉ. होमी भाभा लोकांना माहीत झालेत. तर डॉ. विक्रम साराभाई नावाचा तरूण अमेरिकेतून शिक्षण घेऊन भारतात परतला होता. साराभाईंच्या नेतृत्वामध्ये भारताने नॅशनल स्पेस कमिटीची स्थापना केली आणि अवकाशाला गवसणी घालण्यासाठी भारताच्या भूमीतून रॉकेट उडवण्याची तयारी सुरू झाली. पण अनेकांना प्रश्न पडेल रॉकेट लॉंचिंगसाठी हे थुंबा नावाचं गाव आणि हे चर्चच का निवडलं.? त्यामागचं कारण होतं विषवृत्त..थुंबा हे गाव पृथ्वीच्या विषवृत्तापासून जवळ आहे. त्यामुळे कमी इंधनात या गावातून रॉकेट सोडण्यासाठी वातावरण अनुकूल होतं. भौगोलिकदृष्ट्याही ही जागा शास्त्रज्ञांना मोक्याची होती… बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…