सतत मोबाइलला चिकटून राहणाऱ्या मुलांना या आजारांचा धोका

| Updated on: Sep 10, 2024 | 11:59 AM

लहान मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण खूप वाढलं असून त्याचे दुष्परिणामही अनेकांमध्ये दिसून येत आहेत. स्क्रीन ॲडिक्शनमुळे आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या जाणवू शकतात, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडीओतून जाणून घ्या..

हल्ली लहान मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुलं रडू नयेत किंवा खेळतायत म्हणून पालक त्यांच्या हाती मोबाइल सोपवतात. पण यामुळे लहान मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शनचं प्रमाण खूप वाढलंय. सतत मोबाइल पाहणं हे एक प्रकारचं व्यसनच आहे. या व्यसनामुळे लहान मुलांमध्ये आरोग्याच्या विविध समस्याही निर्माण होत आहेत. हा धोका वेळीच ओळखा आणि मुलांना मैदानात खेळायला पाठवा असं आवाहन सजग पालकांनी आणि आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञांनी केलंय. कारण जास्त वेळ मोबाईल पाहण्याने मुलांना मल्टीपल डिसऑर्डर होऊ शकतात असं म्हटलं जात आहे. लठ्ठपणा, न्यूरल डेव्हलपमेंटमध्ये अडथळा, ज्ञानेंद्रियांचा विकास मंदावणे, डोळ्यांचे विकार अशा विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार असल्याचं समोर येत आहे. याविषयी सविस्तर माहिती या व्हिडीओतून जाणून घ्या..

Published on: Sep 10, 2024 11:59 AM
चर्चा तर होणारच… दुबईचं बुर्ज खलिफा आता महाराष्ट्रात! बाप्पासाठी साकारला अनोखा देखावा
अजित पवारांनी ताफा थांबवला अन् गाडीतून उतरले, अपघातग्रस्ताच्या मदतीला दादा धावले, नेमकं काय झालं?