जळगावच्या अमळनेरमधील राडा प्रकरणी मोठी बातमी, संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस अन्…

| Updated on: Jun 11, 2023 | 9:22 AM

VIDEO | अमळनेरमध्ये संचारबंदीचा आजचा दुसरा दिवस, कशी आहे परिस्थिती?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील आमळनेर शहरातील जिंजर गल्लीत दोन गटात हाणामारी होत दगडफेक झाली. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमळनेरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अमळनेर शहरात १० जून सकाळी ११ वाजल्यापासून ते १२ जून सकाळी ११ पर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तर गरज असल्यास संचारबंदीत वाढ करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगितले जात आहे. अमळनेरमधील एका भागात काही तरुणांमध्ये किरकोळ वादामधून हाणामारी झाली. यानंतर काही वेळात दोन गटात दगडफेक झाली. हा प्रकार अमळनेर शहरात दगडी गेट परिसरात जिंजर गल्लीसह गांधलीपुरा भागात घडली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या राड्याप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. जळगावच्या अमळनेरमधील राडा प्रकरणी ६१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Jun 11, 2023 09:21 AM
‘अजित पवार, छगन भूजबळ…’ भाजप नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी अध्यक्ष निवडीवरून निशाना
‘हेच का तुमचे….’, अमोल मिटकरी यांचा टि्वट करत भाजपच्या बड्या नेत्यावर निशाणा