देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर ‘मविआ’ची दुसरी वज्रमूठ सभा, कोणते नेते लावणार हजेरी?
VIDEO | नागपूरमध्ये आज वज्रमूठ सभा, महाविकासआघाडीकडून जय्यत तयारी अन् नेते मंडळी तळ ठोकून
नागपूर : महाविकास आघाडीची आज दुसरी वज्रमूठ सभा नागपूर येथे होणार आहे. या वज्रमूठ सभेची मविआकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही सभा कशी होणार? या सभेला कोण-कोण उपस्थित राहणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असताना नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेचे प्रमुख आकर्षण उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे असणार असल्याचा दावा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला. दरम्यान, आजच्या महाविकास आघाडीच्या सभेसाठी मविआचे मोठे नेते नागपुरातच तळ ठोकून आहेत. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर होणारी ही महाविकास आघाडीची सभा नेमकी कशी होणार, कोणते नेते बोलणार? याकडे राज्यातील साऱ्यांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे. या सभेवर सताधाऱ्यांकडून आणि भाजपकडून मविआच्या सभेवर टीका होत आहे. यावरच भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.