रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक, दोन तास काय खलबतं?

| Updated on: Oct 21, 2024 | 3:33 PM

नुकत्याच झालेल्या मनसेच्या एका पदाधिकारी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली होती. यानंतर आता राज्याच्या राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे.

महायुतीत आता मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या तब्बल दोन तास खलबतं झाली आहेत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी या तिनही नेत्यांमधील बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. तर काही निवडक जागांवर महायुती राज ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यासंदर्भात देखील या बैठकीत चर्चा झाली. दरम्यान, शिवडी, वरळी, माहीमसह काही जागांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे नागपुरातून शनिवारी रात्री 12 वाजता मुंबईत आले. रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा मुंबई विमानतळावरून निघाला. या दोनही नेत्यांच्या वाहनांचा ताफा हा वरळीपर्यंत आला. नंतर हा ताफा अज्ञातस्थळी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघाला. मध्यरात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. या तीन नेत्यांमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त बैठक झाली. राज ठाकरेंसोबत झालेल्या गुप्त बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस पहाटे तीन वाजता सागर बंगल्यावर गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तीन वाजता वर्षा बंगल्यावर पोहोचले.

Published on: Oct 21, 2024 01:41 PM
Sharad Pawar Group Candidate List : शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
”खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर…”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीनं सुजय विखेंना भरला दम