Washim | गडकरींच्या रस्त्याच्या कामाला सेनेचा कधीच विरोध नाही, संपूर्ण आरोप खोटे – माधव ठाकरे
शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नितीन गडकरींना प्रतिप्रश्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.
वाशिम : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाशिम जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांकडून महामार्गाच्या कामाला अडथळा निर्माण केला जात असल्याचं पत्र लिहिलं. त्यानंतर या मुद्द्यावरुन आता जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून नितीन गडकरींना प्रतिप्रश्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे महामार्गाचं काम थांबवण्यासाठी कशाप्रकारे धमकी दिली जाते याची एक कथित ऑडिओ क्लिप टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे. ही ऑडिओ क्लिप शिवसेनेचे रिसोड तालुकाध्यक्ष महादेव ठाकरे यांची असल्याचं कळतंय. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी ज्या रस्त्याचं काम केलं त्याला शिवसेनेचा विरोध नसल्याचं महादेव ठाकरे यांनी म्हटलंय.