Balasaheb Thorat स्पष्टच म्हणाले, ‘खूप टाईमपास झाला, आता लवकर…’

| Updated on: Sep 13, 2023 | 11:41 AM

VIDEO | 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील कारवाईवर माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, '40 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला उशीर, खूप टाईमपास झाला आता लवकर निर्णय द्या'

मुंबई, १३ सप्टेंबर २०२३ | ’40 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला उशीर होत आहे. खूप टाईमपास झाला लवकर निर्णय घ्या’, असे वक्तव्य माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, पक्षांतर बंदीसंदर्भात कायदा केला आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. लोकसभेकडून इतका मोठा कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र आज या मोठ्या कायद्याचे पालन केले जात नसल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. तर 40 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईवर देखील बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. 40 आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला उशीर होत असल्याचे म्हणत या प्रकरणावर खूप टाईमपास झाला आहे, असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. त्यामुळे लवकर निर्णय देण्यात यावा आणि हा निर्णय निरपेक्ष पद्धतीने देण्यात यावा, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 13, 2023 11:40 AM
Manoj Jarange Patil यांचा निर्धार कायम; म्हणाले, ‘आमरण उपोषण सोडायला तयार पण…’
‘तर शिवसेनेचा हिसका दाखवणार’, रुक्मिणीबाई रूग्णालयातील ‘त्या’ प्रकरणावर शिंदे गट आक्रमक