एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘जे गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत झालं तेच…’

| Updated on: Mar 31, 2023 | 5:08 PM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्धल काय केले गौप्यस्फोट?

बुलढाणा : केंद्रीय मंत्री पदासाठी गोपीनाथ मुंडे यांना भाजपने त्रास दिला जे त्यांच्या बाबतीत घडलं तेच आता पंकजा मुंडे यांच्यासोबत घडत आहे, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना किती त्रास दिला हे मला माहिती आहे. केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी त्यांना पहाटे चार वाजेपर्यंत वाट बघायला लावली होती, त्यावेळी मी त्यांच्यासोबत हजर होतो. भाजप नेते पंकजा मुंडे यांच्या बद्दल विचारणा केली असता त्यांचीही पक्षात उपेक्षा केली जात असल्याचे खडसे यांनी म्हटले. भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केली अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये अपमान सहन करावा लागला त्यांना त्रास देण्यात आला असल्याचे खडसे यांनी म्हटले. शुक्रवारी मलकापूर येथे खाजगी कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले.

Published on: Mar 31, 2023 05:07 PM
अमृता फडणवीस धमकी प्रकरणात मोठं अपडेट, अनिल जयसिंघानी आता मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात
बदलापूरचे पर्यावरणपूरक बाप्पा निघाले परदेशवारी करत कॅनडाला !