‘काशीविश्वेश्वरमध्ये औरंगजेबाच्या पत्नीवर अत्याचार झाले’, डॉ. भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले?
VIDEO | 'औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते अन् सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता', डॉ. भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले?
मुंबई, ६ ऑगस्ट, २०२३ | “औंरगजेबाचा दोन राण्या होत्या. त्या काशीविश्वेश्वराला गेल्या होत्या. त्यावेळी तिथं असलेल्या पंडितांनी राण्यांना भ्रष्ट केलं. त्यानंतर तिथं जी मोडतोड औरंगजेबाने केली त्याला ज्ञानव्यापी म्हणून आता ओळखल जातं”, असा मोठा दावा भालचंद्र नेमाडे यांनी केला. तर “औरंगजेबाच्या काळात निम्म्यापेक्षा जास्त हिंदू सरदार होते. सती प्रथा बंद करणारा पहिला औरंगजेब होता. सध्या रोज बातम्या येतात, बायका भ्रष्ट केल्याच्या. तीनशे, साडे तीनशे लहान मुली पळवून नेल्या. सध्या इथे राहायचं कसं? हा प्रश्न आहे”, अशी भूमिका भालचंद्र नेमाडे यांनी मांडली. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तर रौप्य महोत्सवी सांगता समारंभाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि अशोक वाजपेयी उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी भालचंद्र नेमाडे यांनी इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करतांना असे भाष्य केले.