Stock market update : गुंतवणूकदारांना मोठा धक्का, सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

| Updated on: Jun 13, 2022 | 11:40 AM

सध्या सेन्सेक्स तब्बल 1250 पेक्षा अधिक अकांनी घसरलाय.

मुंबई : शेअर मार्केट (stock market) सुरू होताच पहिल्याच सत्रात मार्केटमध्ये मोठी पडझड पहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार देखील अडचणीत सापडले आहेत. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं दिसून आलं.  सेन्सेक्स (Sensex) 1118 अंकांच्या घसरणीसह 53184 च्या पातळीवर सकाळी सुरू झाला होता. तर दुसरीकडे निफ्टी (Nifty) 324 अंकांच्या घसरणीसह 15877 वर सुरू झालाय. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, एल अँड टी, इंडसइंड बँक अशा जवळपास सर्वच प्रमुख कंपन्यांच्या शेअरमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. सध्या सेन्सेक्स तब्बल 1250 पेक्षा अधिक अकांनी घसरलाय. सेन्सेक्समधील घसरण थांबायचं नाव घेत नसल्यानं गुंतवणूकदारांचे धाबे दणाणल्याचं दिसंतय. सन फार्मा आणि पॉवर ग्रिडचे शेअर मात्र हिरव्या निशाणावर कारभार करत आहेत.

 

 

Published on: Jun 13, 2022 11:40 AM
Chatrapati SambhajiRaje : पुन्हा सिद्ध झालं महाराष्ट्र आमच्या बापाचा, संभाजीराजेंच्या समर्थकांची पोस्टरबाजी
Pandharpur : विठ्ठल मंदिरातील लाडूंचा प्रसाद महागला