मराठा आरक्षण न मिळण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार; कुणाचा गंभीर आरोप?

| Updated on: Dec 14, 2023 | 6:17 PM

मराठा आरक्षण न मिळण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण न देण्याचं कारण एकमेव देवेंद्र फडणवीस असल्याचं वातावरण आणि चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक होत सभागृहात म्हटले आहे

नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणच्या मुद्द्यावरून हिवाळी अधिवेशनात चर्चा होत आहे. दरम्यान मनोज जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेट दिला आहे. या मुद्यावरून सध्या सभागृहात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मराठा आरक्षण न मिळण्यास काँग्रेस-राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य हरिभाऊ बागडे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण न देण्याचं कारण एकमेव देवेंद्र फडणवीस असल्याचं वातावरण आणि चर्चा सोशल मीडियावर सुरू असल्याचे हरिभाऊ बागडे यांनी आक्रमक होत सभागृहात म्हटले आहे. तर मराठा आरक्षण जर मराठा समाजाला मिळालं नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही हरिभाऊ बागडे यांनी केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासंदर्भात बोलताना लोकांची गरिबी ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वोट बँक असल्याचा हल्लाबोलही हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना केला.

Published on: Dec 14, 2023 06:12 PM
…तर शिंदे यांना हार घालणार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भास्कर जाधव अन् संजय शिरसाट यांच्या जुगलबंदी
अण्णा हजारे यांच्यामुळे देशाचं वाटोळं… जितेंद्र आव्हाड यांनी केली बदनामी, ‘त्या’ नोटीसीला काय दिलं उत्तर?